श्रीमती मेधा देशमुख-भास्करन जेव्हा त्यांची ऐतिहासिक कादंबरी लिहीत होत्या, तेव्हाच त्यांच्या मनात मोगल-मराठा इतिहासाविषयी ओढ निर्माण झाली. कारण या त्रिधारेच्या 'Frontiers of Karma - the Counterstroke' या पहिल्या खंडाळा शिवाजी महाराज आणि औरंगज़ेब हयांच्यामध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. हा भाग ऑगस्ट २०१६ मध्ये प्रकाशित झाला. या त्रिधारेतला 'The Stratagem' हा दुसरा खंड लवकरच प्रकाशित होईल. श्रीमती भास्करन या व्यवसायानं सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारत, युरोप आणि मध्य-पूर्वेच्या देशांमध्ये औषध उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. दुबईच्या 'खलीज टाइम्स' मध्ये त्या अनेक वर्षां आरोग्यविषयक स्तंभलेखन करत होत्या. भारतात परतल्यावर आता त्या पूर्ण वेळ लेखनात व्यग्र असतात.