डॉ. मूडी यांनी या पुस्तकात मांडलेल्या संशोधनासारखे संशोधनच बहुतेकांच्या आकलनाच्या कक्षा रुंदावेल आणि दोन हजार वर्षांपासून जी गोष्ट आपल्याला परंपरेने शिकवली आहे तिला पुष्टी देईल... ती गोष्ट म्हणजे 'मृत्यूनंतरही जीवन असते'
- एलिझाबेथ कुब्लर रॉस, एम. डी.
मृत्यूसंबंधी आपण प्राप्त केलेले ज्ञानच आपल्या जीवनपद्धतीला महत्वाचे परिणाम देते.
शारीरिक मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे हे पुस्तक सर्वप्रथम १९७५ साली प्रकाशित झाले आणि त्याच्या लोकप्रियतेत आजवर खंड पडलेला नाही. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पुन्हा जीवनात परतलेल्या १०० लोकांचा अतिशय उत्कंठावर्धक, अत्यंत वाचनीय असा हा विलक्षण अभ्यास आहे. ह्या सर्वजणांनी सांगितलेल्या मृत्यूच्या समीपच्या अनुभवांमध्ये कमालीचा सारखेपणा आहे. हे अनुभव इतके सकारात्मक आहेत की ते वाचल्यानंतर आपलं जीवन, मृत्यू आणि त्यानंतरचे आत्मिक/आध्यात्मिक जग यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.
Gezondheid, lichaam en geest