लोकांना रोजच्या मिळमिळीत जीवनात नेहमीच काहीतरी विलक्षण रोमांचित आणि रक्त गोठवण्यासारखं वाचायला आवडतं. डिटेक्टिव्ह साहित्याच्या अफाट लोकप्रियतेचे हेच रहस्य आहे. भारतातच काय पण जगातील इतर देशांमध्येही सर्वात लोकप्रिय साहित्य हे डिटेक्टिव्ह साहित्य आहे. व.कृ.जोशी यांनी वास्तववादी पण ललित स्वरुपाच्या रहस्यकथांद्वारा मराठी साहित्यात एक नवा प्रवाह आणला. त्यांच्या अनुभवांवर आधारलेल्या या कथा वाचकांना निश्चितच आवडतील.