लहानपणी वाचलेल्या गोष्टीतील राजा, ’मी हात लावलेले सारे सोन्याचे होऊ दे’ असा वर मागत आजही सोन्यामागे धावत आहे. सार्या जगभर तो वावरत असलेला दिसतो. त्याच्या कृतीचे परिणाम त्याला व इतर सर्वांना जाणवू लागले आहेत. परंतु प्रगतीचा मार्ग अजूनही धूसरच दिसतो आहे.
व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात त्या मार्गाची दिशा दाखविणारे, सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक व नाझी छळछावणीतून तावूनसुलाखून बाहेर पडलेले डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांच्या तत्त्वांवर हे पुस्तक आधारित आहे. डॉ. अॅलेक्स पॅटाकोस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा, हल्लीच्या काळातही समृद्ध, अर्थपूर्ण जीवन जगायला उपयोग व्हावा!