फिलिप्स इंडिया लि., किर्लोस्कर कन्सल्टंटस् लि. व स्टॅटफिल्ड इक्विपमेंट्स इत्यादी उद्योगसंस्थांमध्ये पर्सोनेल व मार्केटिंग क्षेत्रातील कार्यानुभव. ‘प्रतिसाद कम्युनिकेशन्स’ करीता कॉपीरायटिंग, कॅम्पेन डिझायनिंग, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे व्हिजिटिंग लेक्चरर. ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘किस्त्रीम’ या नियतकालिकांमध्ये दोन वर्षे संपादन
मानस भारती, मुक्तांगण, रोटरी क्लब्स, वैद्यकीय परिषदा, औद्योगिक संस्था, उद्योजकता विकास केंद्र, साहित्य /वाचक मेळावे, शिक्षक - पालक संघ यांसाठी विविध विषयांवर प्रेरक व्याख्याने / प्रशिक्षण
‘मजेत जगावं कसं?’ (चौदावी आवृत्ती), ‘माणसं जोडावी कशी?’ (सहावी आवृत्ती), ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ (सातवी आवृत्ती), ‘यशस्वी व्हावं कसं?’ (तिसरी आवृत्ती), ‘स्त्री विरुद्ध पुरुष’, ‘मस्त राहावं कसं?’, ‘सांगा कसं जगायचं?’, ‘बदला तुमचं भविष्य’, इत्यादी बेस्टसेलर पुस्तके
‘कुर्यात सदा टिंगलम’ (१२०० हून अधिक प्रयोग), ‘गोलमाल’ (७०० हून अधिक प्रयोग), याखेरीज, ‘बुलंद’, ‘अनैतिक’, ‘भांडा सौख्यभरे’ ही यशस्वी नाटके
‘थरथराट’ या पहिल्याच सुपरहिट चित्रपटाच्या संवादलेखनाने पटकथा संवाद क्षेत्रात पदार्पण व ‘खतरनाक’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’, ‘बाप रे बाप’, ‘बजरंगाची कमाल’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘सूडचक्र’, ‘चिमणी पाखरं’, इत्यादी चित्रपटांसाठी पटकथा, संवादलेखन. ‘घरकुल’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे लेखन
‘दुरंगी’, ‘सर्वस्व’ या कादंबर्या, ‘नग आणि नमुने’, हा विनोदी व्यक्तिरेखासंग्रह, ‘मेख’, आणि ‘फिट्टम्फाट’ हे विनोदी कथासंग्रह
‘मजेत जगावं कसं?’ करीता महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार, ‘नग आणि नमुने’ करीता विमादी पटवर्धन व राज्यशासनाचा पुरस्कार, ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ करीता मराठी साहित्य परिषद आणि शिक्षण मंडळ, कर्हाड यांचे पुरस्कार