फिल नाइट हे जगातील पहिल्या क्रमांकाची अॅथलेटिक शू कंपनी ‘नाइके’चे संस्थापक व प्रमुख आहेत. फिल नाइट यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1938 रोजी पोर्टलँड, ओरेगॉन येथे झाला. त्यांनी ओरॅगॉन विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. उच्च दर्जाचे परंतु कमी किमतीचे धावण्याचे बूट आयात करण्याचे सरळसोट ध्येय मनात ठेवून त्यांनी एक कंपनी सुरू केली. ‘ब्ल्यू रिबन स्पोर्ट्स कंपनी’ या नावाने सुरू केलेली कंपनी पुढे विश्वविख्यात ‘नाइके’ कंपनी बनली. या कालावधीत लेखक फिल नाइट यांनी आपले कोच बॉवरमन आणि अन्य साथीदारांसह बुटांच्या संदर्भात विविध प्रयोग केले.