सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.
Vishwas Narayan Nangare-Patil is the Jt Commissioner of police ( Law &Order),Mumbai City and Former Commissioner of Police, Nashik city. Patil is an Indian Police Service officer of 1997 batch and in 2015 he was awarded the President's Police Medal (gallantry) for his role in the counter terrorist operations during 2008 Mumbai attacks.
श्री विश्वास नांगरे पाटील हे १९९७च्या बॅच चे आय पी एस अधिकारी असून त्यांची एकाच वेळी आयपीएस, उपजिल्हाधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली होती. त्यांनी मुंबई विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांच्या नावावर एम डी पी एम, एल एल बी या पदव्याही आहेत. आत्तापर्यंत त्यांनी लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक, दक्षिण मुंबई पोलीस उपायुक्त, पश्चिम मुंबई आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे अपर पोलीस आयुक्त, औरंगाबाद आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक शहर पोलीस आयुक्त, या पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते मुंबई शहराच्या पोलीस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.