"ताजमहालमध्ये सरपंच"' हा कायम टवटवीत राहतील अशा कथांचा संग्रह. या कथा म्हणजे खुसखुशीत विनोदाआडून घडवलेलं वास्तवर्दनच! शंकर पाटील यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, वगनाट्य असे विविध साहित्यप्रकार हाताळले असले तरी ग्रामीण कथाकार म्हणूनच ते अधिक लोकप्रिय झाले. या संग्रहातील कथांमधून ग्रामीण राजकारण, जीवनौली तसंच समाजातील काही नमुनेदार नगांचं चित्रण आढळतं. प्रत्येक कथा चटपटीत संवाद आणि चुरचुरीत विनोद ल्यालेली दिसते. ती ठरवून लिहिलेली नाही तर उलगडत गेलेली आहे. सहजता आणि सोपेपणा या वाशिष्ट्यांमुळे या कथा वाचकाच्या मनाला भिडतात.