SUDHA MURTYNCHYA BALKATHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
ספר דיגיטלי
156
דפים
הביקורות והדירוגים לא מאומתים מידע נוסף

מידע על הספר הדיגיטלי הזה

INDIA'S FAVOURITE STORYTELLER BRINGS ALIVE THIS TIMELESS TALE WITH HER INIMITABLE WIT AND SIMPLICITY. DOTTED WITH CHARMING ILLUSTRATIONS, THIS GORGEOUS CHAPTER BOOK IS THE IDEAL INTRODUCTION FOR BEGINNERS TO THE WORLD OF SUDHA MURTY.

"तुमच्या लक्षात आलंय, कांद्याला कसे खूप पदर असतात ते? आणि कांदा चिरत असताना तुमच्या आईच्या डोळ्यांतलं पाणी तुम्ही बघितलंय? कांद्याला इतके पदर का असतात आणि तो चिरताना आपल्या डोळ्यांत पाणी का येतं, याचा उलगडा करणारी कथा उल्लेखनीय आहे. 

आंब्याची मधुर चव आपल्याला सर्वांनाच आवडते. उन्हाळ्यातील तप्त दिवशी आंबा आपली तहान आणि भूक भागवतो; पण आंब्याला त्याची ही मंत्रमुग्ध करणारी चव कुठून प्राप्त झाली असेल, असं कोडं तुम्हाला कधी पडलंय का? आंब्यात ही गोडी कशी आली याची कहाणी मोठी रोमांचकारी आहे.

पृथ्वीचं जगावेगळं सौंदर्य, सुंदर सुंदर हिमाच्छादित अशी शिखरं आणि खोल समुद्र, रंगीबेरंगी फुलं आणि नानाविध प्रकारचे प्राणी हे सगळं पाहून तुमचं मन कधीतरी पृथ्वीवरच्या या सौंदर्यामुळे थक्क झालं असेल ना? पृथ्वीवरचं हे निसर्गसौंदर्य कुठून आलं, याची कहाणी खरोखर मनोवेधक आहे.

खूप खूप वर्षांपूर्वी समुद्राचं पाणी गोड होतं आणि ते पिण्यायोग्य होतं. ते खारट कसं बनलं याची एक थक्क करणारी कथा आहे.

भारताच्या लोकप्रिय लेखिकेने आपल्या अनन्यसाधारण, खेळकर आणि सरळ, साध्या शैलीत या कालातीत कथा आपल्यासाठी आणलेल्या आहेत. सुंदर सुंदर चित्रांनी नटलेली ही कथापुस्तिका बालवाचकांना सुधा मूर्ती यांच्या कथाविश्वाची ओळख करून देण्यासाठी अगदी योग्य आहे."

על המחבר

SUDHA MURTY IS AN INDIAN EDUCATOR, AUTHOR AND PHILANTHROPIST WHO IS CHAIRPERSON OF THE INFOSYS FOUNDATION. SHE IS MARRIED TO THE CO-FOUNDER OF INFOSYS, N. R. NARAYANA MURTHY. MURTY WAS AWARDED THE PADMA SHRI, THE FOURTH HIGHEST CIVILIAN AWARD IN INDIA, FOR SOCIAL WORK BY THE GOVERNMENT OF INDIA IN 2006.

सुधा मूर्ती यांचा जन्म १९५० साली कर्नाटक राज्यातल्या शिग्गावि येथे झाला. त्यांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयातील एम.टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. पुणे येथे टेल्को कंपनीत निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या स्त्री अभियंता होत्या. त्या विख्यात सामाजिक कार्यकत्र्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. या फाउंडेशनतर्फे करण्यात येणाऱ्या समाजोपयोगी कार्यासाठी त्या विख्यात आहेत. कर्नाटकातल्या सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या चळवळीच्या त्या प्रणेत्या आहेत. १९ नोव्हेंबर, २००४ मध्ये त्यांना समाजकार्याच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल राजलक्ष्मी पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा मूर्ती यांना सामाजिक कार्य आणि साहित्यसेवेसाठी सहा डॉक्टरेट्स मिळाल्या आहेत. यापैकी दोन डॉक्टरेट्स महाराष्ट्रातील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातर्फे देण्यात आल्या. कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठाकडून साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी एक आणि कर्नाटक विद्यापीठाकडून एक अशा दोन डॉक्टरेट्स त्यांना बहाल करण्यात आल्या. तमिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने आणि आंध्रप्रदेशातील श्री पद्मावती विश्वविद्यालयानेही त्यांना डॉक्टरेट्स देऊन सन्मानित केले. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना 2020 सालीच्या 21व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये पद्मभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

LEENA SOHONI IS A PROLIFIC WRITER AND A TRANSLATOR AND HAS BEEN CLOSELY ASSOCIATED WITH MEHTA PUBLISHING HOUSE FOR OVER 33 YEARS. SHE HAS TRANSLATED OVER FIFTY FIVE BOOKS INTO MARATHI INCLUDING THE MUCH TALKED ABOUT LAJJA, BY BANGLADESHI AUTHOR TASLIMA NASREEN. APART FROM TRANSLATION LEENA ALSO WRITES IN PERIODICALS, DAILIES AND ON DIGITAL PLATFORMS IN ENGLISH AND MARATHI. LEENA COMPLETED HER MASTERS IN GERMAN FROM PUNE UNIVERSITY IN THE YEAR 1981 AND WAS AWARDED CHANCELLOR’S GOLD MEDAL FOR SECURING THE HIGHEST RANK IN THE ARTS FACULTY. LEENA IS A RECEIPIENT OF NUMEROUS LITERARY AWARDS INCLUDING THE STATE GOVERNMENT AWARD FOR BEST TRANSLATION (FOR HER TRANSLATIONS: LAJJA BY TASLIMA NASREEN AND WISE AND OTHERWISE BY SUDHA MURTY), G.A.KULKARNI AWARD, N.C.KELKAR AWARD, BAL SHATRI JAMBHEKAR AWARD AND RANJIT DESAI AWARD TO NAME A FEW. SHE HAS ATTENDED ADVANCED TEACHERS’ TRAINING COURSES IN GERMANY ON SCHOLARSHIPS, ONCE BY THE GOETHE INSTITUTE AND ONCE BY THE CULTURAL MINISTRY OF GERMANY.

लीना सोहोनी यांनी १९८१ साली पुणे विद्यापीठातून जर्मन विषयात पदव्युत्तर पदवी संपादित केली. त्यावर्षी कलाशाखेत सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना चॅन्सेलर्स सुवर्णपदक प्राप्त झाले. मुंबईच्या मॅक्स म्युलर भवनतर्फे २००३मध्ये आणि जर्मनीच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे २००९मध्ये जर्मन विषयाच्या अध्यापन प्रशिक्षणासाठी संपूर्ण आशिया खंडातून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी कोल्हापूरमधील विवेकानंद महाविद्यालयात जर्मन विषयाचे अध्यापक म्हणून काम केले असून सध्या त्या पुण्यात वास्तव्यास आहेत. अनुवाद व लेखन यांमध्ये विशेष रुची असलेल्या लीना सोहोनी यांची मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे अनेक अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सन्मान व पुरस्कार – राज्यशासनाचे सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यासाठीचे पुरस्कार : लज्जा , लेखिका : तस्लिमा नासरिन,(१९९४-९५), वाइज अँड अदरवाइज , लेखिका : सुधा मूर्ती (२००३-०४) इतर – स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार (२००१), साहित्यभूषण पुरस्कार , वुमन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अ‍ॅन्ड पब्लिक वेल्फेअर फौंडेशन, कोल्हापूर (२००८), त्याचवर्षी सहाव्या गोमंतक महिला साहित्य संमेलना चे अध्यक्षपद भूषविले. आपटे वाचन मंदिर यांचा सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्याचा पुरस्कार (२००८-०९), द गोवा हिंदू असोसिएशन तर्फे जी.ए. कुलकर्णी पुरस्कार , (२००९), आंतरभारती संस्थेतर्फे बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (२०११)

רוצה לדרג את הספר הדיגיטלי הזה?

נשמח לשמוע מה דעתך.

איך קוראים את הספר

סמארטפונים וטאבלטים
כל מה שצריך לעשות הוא להתקין את האפליקציה של Google Play Books ל-Android או ל-iPad/iPhone‏. היא מסתנכרנת באופן אוטומטי עם החשבון שלך ומאפשרת לך לקרוא מכל מקום, גם ללא חיבור לאינטרנט.
מחשבים ניידים ושולחניים
ניתן להאזין לספרי אודיו שנרכשו ב-Google Play באמצעות דפדפן האינטרנט של המחשב.
eReaders ומכשירים אחרים
כדי לקרוא במכשירים עם תצוגת דיו אלקטרוני (e-ink) כמו הקוראים האלקטרוניים של Kobo, צריך להוריד קובץ ולהעביר אותו למכשיר. יש לפעול לפי ההוראות המפורטות במרכז העזרה כדי להעביר את הקבצים לקוראים אלקטרוניים נתמכים.