ही कहाणी गोपी नावाच्या एका कुत्र्याची आणि त्याला दत्तक घेऊन आपल्या घरी आणणार्या एका प्रेमळ कुटुंबाची. सुधा मूर्ती यांच्या खास शैलीतून उतरलेल्या कहाणीतून हा गोपी कुत्रा स्वत:शीच बोलतो. सुरुवातीला छोटंसं पिल्लू असलेला गोपी नंतर मात्र जास्त खोडकर आणि खट्याळ होतो. त्याच्या आयुष्यात आणखी दोन सोबती कुत्रेसुद्धा येतात. गोपी हा खरंतर एक चिरंतन ऊर्जेचा आणि चैतन्याचा झराच. गोपीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो, की त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का त्याला त्या दिवशी बसतो... त्याच्या आयुष्यात नवीन आकर्षणं निर्माण होतात आणि त्याला एक नवी मैत्रीणसुद्धा मिळते - आकर्षक अशी नोव्हा. ते दोघं मिळून त्यांचं स्वत:चं कुटुंब निर्माण करतात... सुधा मूर्तींच्या लेखनाचे चाहते असलेल्या आबालवृद्धांना हा गोपी खूप आनंद देऊन जाईल आणि आपल्या छोट्या पावलांनी त्यांच्या हृदयात शिरकाव करून, तिथे कायमचं स्थान मिळवून बसेल, यात शंकाच नाही. THIS STORY IS ABOUT A DOG NAMED GOPI AND A LOVING FAMILY WHO ADOPTS HIM AND BRINGS HIM HOME. THIS GOPI DOG TALKS TO HIMSELF IN A STORY FROM THE UNIQUE STYLE OF SUDHA MURTHY. INITIALLY A SMALL PUPPY, GOPI LATER BECOMES MORE MISCHIEVOUS AND MISCHIEVOUS. TWO MORE COMPANION DOGS ALSO COME INTO HIS LIFE. GOPI IS ACTUALLY A FOUNTAIN OF ETERNAL ENERGY AND VITALITY. THERE COMES A DAY IN GOPI`S LIFE, WHEN HE GETS THE BIGGEST SHOCK OF HIS LIFE... NEW ATTRACTIONS ARISE IN HIS LIFE AND HE ALSO GETS A NEW GIRLFRIEND - THE CHARMING NOVA. TOGETHER THEY CREATE THEIR OWN FAMILY... THERE IS NO DOUBT THAT THIS GOPI WILL DELIGHT YOUNG AND OLD FANS OF SUDHA MURTHY`S WRITINGS AND ENTER THEIR HEARTS WITH HER TINY STEPS AND SETTLE THERE FOREVER.