‘विश्वात आप्तस्वकीय आणि सहकारी यांच्या साहाय्यानेच मनुष्य कोणतंही मोठं यश प्राप्त करू शकतो’ या विधानाशी आपण सहमत आहात का? आपलं उत्तर जर “हो’ असेल, तर इतरांकडून सहकार्य कसं प्राप्त करावं? या विषयीचं मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात आपल्याला मिळेल. इतकंच नव्हे, तर आपल्या कुटुंबाच्या सर्वोच्च शक्यता विकसित होण्यासही हे साहाय्यकारी ठरेल.
प्रेम, आनंद, विश्वास, शांती, माधुर्य आणि सुदृढ संवादमंच यांसारखे अनेक सकारात्मक पैलू आपल्या परिवाराचा पाया बनू शकतात. मात्र त्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरलेले “विचार नियम’ जाणून ते आत्मसात करायला हवेत. हे नियम अतिशय सहज, सरळ असले, तरी आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतात.
प्रस्तुत पुस्तकात वाचा –
आपल्या विचारांचा परिवारावर होणारा प्रभावशाली परिणामआपल्या विचारांना दिशा देऊन आनंदित परिवार कसा निर्माण करालकसा तयार होईल स्वस्थ परिवारासाठी “पॉवर हाउस’कुटुंबात प्रेम, आनंद, शांती, स्वास्थ्य, समृद्धी आणि संतुष्टी आकर्षित करण्याचं रहस्यनकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून आपल्या परिवाराची रक्षा करण्याची युक्तीयोग्य संवादाद्वारे परिवाराला स्वर्ग बनवण्याचं गुपितक्षमा, शोध आणि कृतज्ञतेच्या शक्तीने नात्यांमध्ये पूर्णता प्राप्तीचे उपायआपल्या कुटुंबात आश्चर्यकारक परिवर्तन बघण्याची अपेक्षा असेल, तर सात विचार नियम आणि उपाय जीवनात आचरणात आणा. मग बघा, आपल्याला जे हवंय, ते निश्चितच प्राप्त होईल!
सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.
सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).
सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.
सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.