एका प्रतिभावान लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या, मनात घर करून राहणाऱ्या, देश-विदेशच्या गमतीशीर आणि चटकदार कथा खास बालचमूंसाठी. राजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजी-आजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या...या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्ष लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्यार्थ्याना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत.
Google Play থেকে কেনা অডিওবুক আপনি কম্পিউটারের ওয়েব ব্রাউজারে শুনতে পারেন।
eReader এবং অন্যান্য ডিভাইস
Kobo eReaders-এর মতো e-ink ডিভাইসে পড়তে, আপনাকে একটি ফাইল ডাউনলোড ও আপনার ডিভাইসে ট্রান্সফার করতে হবে। ব্যবহারকারীর উদ্দেশ্যে তৈরি সহায়তা কেন্দ্রতে দেওয়া নির্দেশাবলী অনুসরণ করে যেসব eReader-এ ফাইল পড়া যাবে সেখানে ট্রান্সফার করুন।