आदमची डायरी म्हणजे त्याच्या मनोव्यापाराचे लेखकाने केलेले शब्दांकन. निसर्गासह पशु-पक्षी -प्राणी यांच्या सहवासात तो आनंदाने कालक्रमण करतो. पुढे त्याच्या जीवनात पहिली स्त्री 'ईव्ह' येते. त्यांचं सहजीवन सुरू होतं. नित्यनविन शिक्षण सुरूच असंत. त्यांच्या संसारवेलीवर फूले उमलू लागतात. त्यांच्या या अनुभवाची ही कहाणी अतिशय ह्रद्य आहे.