लपाछपी, आंधळी कोशिंबीर, खांबखांबोळी, लगोरी, सागरगोटे, विट्टीदांडू, मामाचं पत्र हरवलं, जेवणासाठी पाट आणि चौरंग, आंघोळीसाठी बंब आणि घंघाळं...जातं, चूल, उखळ... हे वाचून तुम्हाला वाटेल ही उद्योजकाची यशोगाथा आहे की एखाद्या जुन्या वाड्याचं वर्णन. पण यावेळची आपली यशकथाच अशी आहे, एका उदयोगाचं यश सांगणारी आणि ऐकता ऐकता आपल्याला वाड्यातल्या बालपणात नेणारी. ऐका 'ढेपे वाडा: उद्योजकतेचा चिरेबंदी वाडा' मिलिंद कुलकर्णी यांच्यासह