कोणत्याही उद्योगाचं यश हे त्याच्या उलाढालीवर, वाढत्या नफ्याच्या प्रमाणावार ठरवलं जातं. अमृतयात्रा या मुंबईतल्या पर्यटन संस्थेचं यश मोजताना पैशाचा मापदंड लावण्याबरोबरच आणखीही महत्वाच्या गोष्टी बघाव्या लागतात. व्यवसायाचा भाग म्हणून अमृतयात्राला पैसे मिळतातच पण त्यासोबतच मिळतं ते अनोखं समाधान प्रवाशांच्या संवेदना जागृत केल्याचं, काही प्रमाणात समृद्ध केल्याचं! 'अमृतयात्रा'चा हा प्रवास ऐका मिलिंद कुलकर्णी यांच्यासह.