इतिहासाचा आधार असते कालगणनेची संदर्भ रेषा. त्यामुळे योग्य इतिहासाचे भान येण्याकरिता भारतीय कालगणना माहीत हवीच. काल ही चौथी मिती आहे. या कालगणनेचा भारतीयांनीही किती व्यापक, सखोल व शास्त्रीय विचार केला आहे, याची संपूर्ण साधार माहिती गौरवशाली भारतीय कालगणना यात आहे. कालगणना हा फक्त ज्योतिष्य किंवा विद्वानांचा बोजड विषय आहे, असे समजून आपण सामान्य माणसे यापासून दूर राहतो. परंतु असे नाही. आपल्यालाही ते सहज समजू शकेल, अशी सोपी व नेमकी मांडणी यात आहे. जगभर सोमवार नंतर मंगळवारच येतो. तसा तो का येतो. असा खुलासा भा. कालगणनाच देऊ शकते.