भारताच्या लाडक्या कथाकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकार झालेली एक नवी साहस कथा.शहरात वाढलेली मुलगी अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी येते. खेड्यातलं संथ जीवन बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो; पण ती लगेचच तिथे रुळते. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, सहलीला जाणं, सायकल चालवायला शिकणं आणि नव्या मित्र-मंडळींबरोबर झालेली दोस्ती या सगळ्यात तिचे दिवस भराभर जाऊ लागतात...आणि एक दिवस गावाजवळच्या रानात आपल्या मित्र-मंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना अनुष्काला एका जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीबद्दल तिनं नुकतीच आजीकडून एकदंत कथा ऐकलेली असते.निर्भय अनुष्का सोबत एका नव्या साहसासाठी तयार व्हा! सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकाची गोडी अवीट आहे. ते एकदा हातात आल्यावर खाली ठेवावंसं वाटणारच नाही!
Beletrystyka i literatura