पावसाचं आणि शंकर पाटलांचं एक नातं आहे. ते एकदा म्हणाले होते, ‘पाऊस म्हणजे माझा जिवलग दोस्त! उन्हाची खाई उसळली की माझी तगमग सुरू होते. अगदी गुदमरल्यासारखं वाटतं; पण पाऊस एकदा का कोसळू लागला, की माझ्या चित्तवृत्ती उल्हसित होतात.’त्यांचं म्हणणं खरं आहे. ‘आभाळ’ ‘वळीव’ अशा कितीतरी कथांतून पावसाची विविध रूपं त्यांनी चित्रित केली आहेत. झिमझिम पाऊस, ताशा बडवत राहिलेला पाऊस, काठी टेकत येणारा पाऊस, धुवाधार पाऊस, थट्टेखोर पाऊस, गारांचा सडा टावूâन घेरणारा पाऊस... पण पाऊस अंगावर झेलण्यात एक अपूर्व आनंद आहे! मला विनोबांची पावसातली एक सभा आठवते. पाऊस झिमझिम पडू लागला तशी ते म्हणाले होते, ‘मला विलक्षण आनंद होतो आहे. जणू परमेश्वरच आपल्या सहस्त्रधारांनी या धरतीला कडाडून मिठी मारत आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे परमेश्वराचा स्पर्श!’
Grož. ir negrož. literatūra