‘रानफुले’ हा वि. स. खांडेकरांनी सन १९२७ ते १९६१ या कालखंडात लिहिलेल्या परंतु अद्याप असंकलित राहिलेल्या लघुनिबंधांचा संग्रह. यात वाचकांना रानफुलांच्या रंग, गंध, आकार, सौंदर्याचा अस्सलपणा अनुभवायला मिळेल. रानफुले सुंदर असली तरी बऱ्याचदा उपेक्षित नि अस्पर्शित रहातात. मराठी साहित्य वाटिकेतून विहार केलेल्या अभ्यासू, संशोधक वाटसरुंचे या देशीकार सौंदर्य लेण्यांकडे अद्याप लक्ष कसं गेलं नाही याचं आश्चर्य वाटल्यावरून ती जिज्ञासू नव वाचकांसाठी मुद्दाम खुडून आणलीत.