अर्थ मराठी हे नाव माहितीजालावर मागील ३ वर्षां पासून सुप्रसिद्ध आहे. दिवाळी अंक, ब्लोग , आणि असंख्य अॅन्ड्रॉइड अॅप्लिकेशन द्वारे आम्ही लोकापर्यंत पोचलो आणि जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याचा आमचा मानस आहे.
यातच एक पाऊल पुढे टाकत आता अर्थ मराठी हे नाव दिवाळी अंकापुर्तच मर्यादित राहिलेले नसून गेल्या वर्षी दिलेल्या वाचनाची पूर्तता करत यंदा अर्थ मराठी हे आता www.aarthmarathi.com या नावाने मराठी सोशल मिडिया म्हणून उदयाला आले आहे. खरे पाहता फेसबुक, ट्विटर, WhatsApp, हाईक सारखे पर्याय उपलब्ध असताना त्यात आता आणखी भर कशाला? तर जागतिक भाषांवर आधारित संकेतस्थळांचे सर्वेक्षण करत असताना मराठीमध्ये अशा प्रकारचे संकेतस्थळ उपलब्ध नसल्याचे माझ्यासमोर आले म्हणून मराठीमध्ये देखील असे संकेतस्थळ सुरु करायचे आणि जास्तीत जास्त मराठी लेखकांना संकेतस्थळाचा लाभ घेता यावा यासाठी मी प्रयत्न करायचे ठरवले. इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात आणि अक्षर प्रभू देसाई ने स्वतः पुढाकार घेऊन अर्थ मराठी नावाचे संकेतस्थळ तयार केले.
संकेतस्थळ वापरात असताना सुरुवातीला आपल्याला काही अडचणी येतील. परंतु नंतर आपण स्वतः इथे उत्तम लेख लिहू शकता.
आपलाच,
अभिषेक ठमके