पलायनानंतर यशवंतरावांनी खानदेशातल्या आक्रानीची वाट धरली. वाटेत नाट्यमयरित्या एक रणझुंजार सोबतीही मिळाला. त्याच वेळेस दौलतरावाचा सरदार दुल्लेखान आक्राणीवर चालून जात होता. विठोजी या आक्रमणाला परतवण्यासाठी भिल्लांची तुटपुंजी फौज घेऊन एका दुर्गम खिंडीत त्यांच्याशी लढायला उभा ठाकला होता. ऐन वेळेस तेथे यशवंतराव व त्यांचे दोन सोबती पोहोचले. यशवंतरावांनी समयसुचकता दाखवत जीवावरचा धोका पत्करुन दुल्लेखान व त्याच्या फौजेचा कसा बिमोड केला?