इंग्रजांविरुद्ध सर्व रजवाड्यांनी एकत्र येत युद्ध करावे असा संदेश जरी यशवंतराव सर्वांना पाठवत असले तरी कोणी प्रतिसाद देत नव्हते. जनरल लेक आता पिसाळून यशवंतरावांचा नायनाट करण्यासाठी तडफडत होता. आणि मग झाले भरतपुरचे महायुद्ध! ब्रिटिशांचे नाक दुस-यांदा छाटले गेले. आजवर अजिंक्य असलेल्या लेकलाही पराभव स्विकारावा लागला. तो यशवंतरावांनी आता मैत्रीचा व शांततेचा तह करावा यासाठी मागे लागला. यशवंतराव शीख रजवाडे तरी साथ देतील या आशेने लाहोरला गेले. महाराजा रणजितसिहांनी तरी त्यांना साथ दिली काय?