कर्नल फॉसेटच्या तळावर अचानक हल्ला करुन त्याच्या दोन पलटनी कापून काढत यशवंतराव कर्नल मॉंन्सनच्या दिशेने वळाले. आधी माघार घेण्याचे नाटक करुन त्याला पार चंबळ नदीपर्यंत यायला भाग पाडले आणि पावसाळा सुरु झाला. यशवंतरावांनी पहिला भिषण प्रहार केला आणि आता कर्नल मॉन्सन पळत सुटला. भर पावसात अडीचशे मैलांचा पाठलाग करत दमादमाने त्याची सारी सेना कापुन काढली. मॉन्सनचा इंग्रजांचे नाक कापणारा लाजिरवाणा पराभव झाला. मग यशवंतरावांनी आपला मोहरा वळवला दिल्लीकडे! कशासाठी?