मानसिक स्वास्थ्याचं रहस्य
एखाद्या आजाराचं वा रोगाचं मूळ हे आपल्या विचारांत दडलेलं असतं. म्हणून आपल्याला प्रथम आपल्या बुद्धीवर विजय प्राप्त करावा लागेल. त्यासाठी विचारनियमांचं साहाय्य घ्यायला हवं.
एक सर्जनशील विचारनियम आहे, “जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात.’ आपण जेव्हा ईश्वरीय विचारांचं आपल्या मनाद्वारे प्रसारण करतो, तेव्हा हा नियम आपल्यासाठी कार्य करू लागतो. त्यानंतर ईश्वरानं आपल्यासाठी जे काही बनवलंय ते आपल्या जीवनात येऊ लागतं. संपूर्ण स्वास्थ्य, योग्य व्यवसाय, योग्य उद्दिष्ट, प्रेम, कला, गुण, यश, ज्ञान, विकास यांसारख्या सकारात्मक गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. परिणामी आपण नेहमी आनंदी राहण्याची कला शिकतो. जो स्वतः आनंदी आहे, केवळ तोच इतरांना आनंदी बनवू शकतो, इतरांचं भलं करू शकतो.
चला तर मग, प्रस्तुत पुस्तकातील विचारसूत्र, स्वसंवाद, महाअनुवाद आणि पक्षवाक्य यांच्या साहाय्याने आपली बुद्धी शांतिपूर्ण अनुभव, सकारात्मक शब्द आणि सत्यावी विचारांनी भारू या. जेणेकरून आपल्याकडे एक सुंदर, विशाल अशा आश्चर्यकारक विचारांचं भांडार निर्माण होईल, जे आपल्याला प्रत्येक आजारातून, रोगातून मुक्त करू शकेल.
सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.
सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).
सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.
सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.