आक्राणीला सोबती मिळायला सुरुवात झाली. मीरखानासारखे पेंढारीही येऊन मिळाले. पेशव्यांशी पत्रव्यवहार करुन जप्त झालेल्या होळकर दौलतीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु केला. यशवंतरावांनी माळवा आणि गुजरातमध्ये स्वा-या करुन धन जमा करायचा सपाटा लावला. त्यात धारचे संस्थानिक आनंदराव पवारांनी यशवंतरावांची मदत मागितली. काय होते ते प्रकरण? कसे सोडवले ते यशवंतरावांनी? त्यानंतर वेगवान हालचाली करत, धमासान युद्धे करत आपले जप्त केलेले प्रांत सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले?
Beletristika i književnost